विराट-अनुष्काचा हा Selfie झाला व्हायरल, वाचा कोण आहे तो...

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 27, 2017, 12:10:00 PM IST

स्पोर्ट्स डेस्क - मुंबईच्या लोअर परळला झालेल्या विराट अनुष्काच्या लग्नाच्या रिसेप्शनचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. मात्र, त्या शेकडो फोटोंममध्ये विराट आणि अनुष्काच्या एका माणसाबोतच्या सेल्फीने सर्वांची मने जिंकली आहेत. सर्वत्र या सेल्फीची चर्चा केली जात आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोतील व्यक्ती नेमकी कोण आहे, हे जाणून घेऊ...

 

 

- विराट आणि अनुष्काच्या व्हायरल सेल्फीमध्ये दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव गयान सेनानायके असे आहे. तो फिजिकली चॅलेन्ज आहे. तरीही, श्रीलंकन क्रिकेटचा एकही सामना त्याने सोडलेला नाही. सामना कुठेही असला तरीही तो तेथे पोहचून लाइव्ह पाहतो. सध्या तो भारत दौऱ्यावर आहे. 
- गयानला हाडांचा दुर्मिळ आजार आहे. त्यामुळेच, तो स्वतः उभा देखील राहू शकत नाही. गयानने सांगितल्याप्रमाणे, तो नुकताच 36 वर्षांचा झाला आहे. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी तो कुठेही जाऊ शकतो. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुथैया मुरलीधरन, जेहान मुबारक, महेला जयवर्धने आणि श्रीलंकन क्रिकेट बोर्डचे अधिकारी जयंत सुद्धा गयानची मदत करतात. 
- सेनानायकेला दुसऱ्या देशात जाऊन श्रीलंकेचे सामने पाहण्यासाठी तिकीटांची व्यवस्था त्यांच्याकडूनच करून दिली जाते. 

 

विराटची मदत घेतली नाही
- गयानने सांगितल्याप्रमाणे, विराट आणि रोहितला गयानच्या आजाराबद्दल कळाले तेव्हा त्या दोघांनीही त्याला आर्थिक मदतीचा प्रस्ताव दिला होता.
- पण, गयानने ती मदत घेण्यास नकार दिला. आपल्या देशातून मिळणारी मदत आपल्यासाठी पुरेसी आहे असे तो म्हणतो.
- गयानला कित्येक क्रिकेटर्सने आपल्या जर्सी गिफ्ट केल्या आहेत. त्याच्याकडे आता प्रसिद्ध क्रिकेटर्सच्या 57 जर्सी आहेत. गयानने यापूर्वीही अनेकवेळा विराटसोबत लंच केले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, गयान आणि पार्टीचे आणखी काही फोटोज...