विरुष्काच्या पार्टीत सहकुटुंब पोहोचला सचिन, सारावर टिकल्या सर्वांच्या नजरा...

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 27, 2017, 11:27:00 AM IST

स्पोर्ट्स डेस्क - विराट-अनुष्काच्या लग्नाच्या दुसऱ्या रिसेप्शन पार्टीला अनेक क्रिकेटर्स सहकुटुंब पोहोचले. त्यापैकीच एक सचिन तेंडुलकरही होता. तो आपली पत्नी अंजली आणि मुलगी सारासह पोहोचला. ही ग्लॅमरस पार्टी बॉलिवुड आणि क्रिकेट सिलेब्सने गजबजलेली असली तरीही सचिनच्या कन्येचा ग्लॅमरस लुक सर्वांना आकर्षित करत होता. तिच्या लुकमुळे सर्वांच्या नजरा सारावर टिकल्या होत्या. ती आपले वडील सचिनसोबत पोझ करत होती. 

 

असा होता सचिन & फॅमिलीचा लुक...
- विराट-अनुष्काच्या रिसेप्शनला सचिन सहकुटुंब पोहोचला तरीही त्याचा मुलगा अर्जुन अनुपस्थित राहिला. पार्टीत सारा तेंडुलकरवर सर्वांच्या नजरा टिकल्या होत्या. ती अतिशय ग्लॅमरस लुकमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत पोहचली होती. 
- साराने या फंक्शनमध्ये व्हाइट कलरचा शॉर्ट फ्रॉक घातला होता. सोबतच कानात मॅचिंग व्हाइट ईयररिंग्स सुद्धा होते. 
- साराची मम्मी अंजली तेंडुलकर ट्रेडिशनल लुकमध्ये दिसली. तिने सलवार आणि सूट घातला होता. तर सचिनने ब्लॅक सूट घातला होता. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, सचिन, अंजली आणि साराचे आणखी काही फोटोज...