धोनी ते धवन पर्यंत, कॅप्टनच्या रिसेप्शनला पोहोचले सगळेच क्रिकेटर्स

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 27, 2017, 11:34:00 AM IST

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मुंबईत पार पडले. लोअर परळच्या सेंट रेजिस हॉटेलात पार पडलेला हा सोहळा रात्री उशीरा 2 पर्यंत ही पार्टी सुरूच होती. जगातील फिटेस्ट आणि बेस्ट क्रिकेटर्सपैकी एक कोहलीच्या रिसेप्शनला इंडियन क्रिकेट टीमचे अनेक दिग्गज क्रिकेटर्स पोहोचले. यात माजी कर्णधार एसएस धोनीसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा देखील समावेश होता. 

 

- मुंबईत झालेल्या या रिसेप्शनला एमएस धोनी, रोहित शर्मा, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, हरभजन सिंग, युवराज सिंह, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, उमेश यादव, आर. अश्विन असे विद्यमान क्रिकेटर्स पोहोचले.
- टीम इंडियाच्या माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, आशीष नेहरा, विरेंद्र सेहवाग, झहीर खान, अनिल कुंबळे, सुनील गावसकर आणि संदीप पाटील यांच्यासारखे दिग्गज देखील उपस्थित होते. 
- यात धोनी, रोहित, सचिन, झहीर, कुंबळ, गावसकर आणि पाटील सपत्निक पोहोचले होते. 
- इतर स्पोर्ट्स सेलिब्रिटीजमध्ये स्टार शटलर सायना नेहवाल आणि टेनिस दिग्गज महेश भूपती आपल्या पत्नी लारा दत्तसहित पोहोचला होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्पोर्ट्स जगतातून विरुष्काच्या लग्नात आलेले सेलिब्रिटीज...