विरुष्काच्या पार्टीत युवी-भज्जीची मस्ती, अशी घेतली एकमेकांची फिरकी...

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 27, 2017, 12:44:00 PM IST

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर्स युवराज सिंह आणि हरभजन सिंग आपल्या फनी स्टाइलसाठी ओळखले जातात. दोघांमध्ये अतूट मैत्री असून एकमेकांची फिरकी घेण्याची कुठलीही संधी ते सोडत नाहीत. विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शनला हे दोघे एकत्रित आले, तेव्हा देखील हे दोघे मस्तीच्या मूडमध्ये होते. दोघेही एमेकांची फिरकी घेऊन हसताना दिसून आले.

 

- युवराज सिंह आणि हरभजन सिंग या दोघांनीही आपल्या जोडीदारांना घरीच सोडून एकटे येणे पसंत केले. पार्टीत एंट्री करत असतानाच या दोघांची थट्टा-मस्करी सुरू झाली. 
- दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसून आले. तसेच एकमेकांची फिरकी घेऊन जोर-जोरात हसत होते. 
- युवी-भज्जी यांनी आधी कॅमेऱ्यांसमोर पोझ करण्यासाठी एकमेकांचे हात धरले. मग, अचानक रोमॅन्टिक होऊन पोझ द्यायला लागले. 
- यानंतर युवीने भज्जीच्या ड्रेसिंग सेन्सची मस्करी केली. भज्जीने देखील आपल्याच शैलीत उत्तरे दिली. यानंतर दोघांचा हास्यकल्लोळ होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या दोघांच्या मस्तीचे आणखी काही फोटोज...