बॅंक एफडीपेक्षा दुप्पट मिळेल रिटर्न, नवीन वर्षात 500 रुपयांनी करा गुंतवणूक

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 28, 2017, 05:27:00 PM IST

मुंबई- इक्विटी म्युचल फंड बॅंक एफडीच्या तुलनेत दुप्पट रिटर्न देत आहे. सध्याच्या परिस्थितीत बॅंक एफडीवर ७ ते ७.५० टक्के रिटर्न मिळत आहे. क्रिसिल-एएमएफआय इक्विटी फाड परफॉर्मन्स इंडेक्सनुसार इक्विटी म्युचल फंडने गेल्या ५ वर्षात १६.५८ टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या वर्षाबाबत बोलायचे झाले तर इक्विटी म्युचल फंडने वार्षिक १५.३१ टक्के रिटर्न दिला आहे. अशा प्रकारे तुम्ही इक्विटी म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करुन एफडीपेक्षा दुप्पट रिटर्न मिळवू शकता.

 

५०० रुपयांपासून सुरु करु शकता गुंतवणूक
तुम्ही इक्विटी म्युचल फंड एसआयपीमध्ये ५०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. भविष्यात तुमची सेव्हिंगची क्षमता वाढली तर तुम्ही गुंतवणूक वाढवू शकता. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार प्रत्येक वर्षी गुंतवणूक १० ते २० टक्क्यांनी वाढवू शकता. त्याने तुम्ही दिर्घ कालावधीसाठी मोठा फंड तयार करु शकता.

 

टॅक्स फ्री असेल रिटर्न
बॅंकबाजारडॉटकॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितले, की इक्विटी म्युचल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने केवळ चांगला रिटर्न मिळणार नाही तर एका वर्षाने हे रिटर्न टॅक्स फ्री असेल. एफडीवर वार्षिक केवळ १० हजार रुपयांपर्यंतचे व्याज टॅक्स फ्री असते. यापेक्षा जास्त रिटर्न मिळाले तर त्यावर टॅक्स लावला जातो. त्यामुळे तुमचे एफडीचे रिटर्न कमी होते.

 

पुढील स्लाईडवर वाचा, या गुंतवणुकीवर मिळतील या सुविधा....