'विरुष्का'च्या रिसेप्शनला पोहोचलेल्या सारा-इब्राहिमने का मारली होती तैमूरच्या बर्थडेला दांडी, वाचा

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 28, 2017, 04:30:00 PM IST

मुंबई : करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर 20 डिसेंबर रोजी एक वर्षांचा झाला. करीना-सैफने आपल्या लाडक्या मुलाचा पहिला वाढदिवस आलिशान पतौडी पॅलेसमध्ये साजरा केला. वाढदिवसाच्या दोन दिवसांपूर्वीच हे तिघे पतौडी पॅलेसमध्ये दाखल झाले होते. तैमूरचा वाढदिवस एखाद्या मोठ्या सोहळ्यापेक्षा कमी नव्हती. वाढदिवसाला तैमूरचे आजी आजोबा अर्थातच शर्मिला टागोर, बबिता आणि रणधीर कपूर यांनी हजेरी लावली होती. याशिवाय करिश्मा कपूर आणि तिची दोन्ही मुले समायरा आणि किआनसुद्धा पतौडी पॅलेसमध्ये उपस्थित होते. करीनाची जवळची मैत्रीण अमृता अरोरादेखील तिच्या पती आणि मुलांसोबत पोहोचली होती. पण या वाढदिवसाला तैमूरचे सावत्र बहीणभाऊ अर्थातच सारा आणि इब्राहिम हजर नव्हते.

 

का मारली दांडी... हे होते कारण... 

खरं तर तैमूर हा इब्राहिम आणि साराचा लाडका भाऊ आहे. तसेच करीनाही या दोघांच्या अगदी जवळची आहे. त्यामुळे तैमूरच्या पहिल्या वाढदिवसाला सारा आणि इब्राहिमची अनुपस्थिती अनेकांना खटकत होती. पण या दोघांनी विराट आणि अनुष्काच्या मुंबईतील रिसेप्शनला मात्र हजेरी लावली होती.

 

तैमूरच्या वाढदिवसाला सारा तिच्या 'केदारनाथ' या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंग आणि वर्कशॉपमध्ये बिझी होती. त्यामुळे ती तैमूरच्या बर्थ डे पार्टीला येऊ शकली नाही. सध्या ती तिच्या करिअरबाबत अतिशय फोकस असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे लंडनमध्ये शिकणाऱ्या इब्राहिमला ख्रिसमसच्या सुट्टीत आई अमृतासोबत वेळ घालवायचा होता. त्यामुळे बहीण साराही मुंबईत असल्यानेमु त्याला तैमूरच्या बर्थ डेला जाता आले नाही.

 

मामासुद्धा होता अनुपस्थित...

फक्त सारा आणि इब्राहिमच नाही तर मामा रणबीर कपूरही बिझी शेड्यूलमुळे तैमूरच्या पार्टीला हजर राहू शकला नाही. पण रणबीरने मुंबईत तैमूरसोबत ख्रिसमस पार्टी साजरी केली. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, तैमूरच्या फस्ट बर्थडे सेलिब्रेशनचे निवडक PHOTOS...