एक्स-प्रेझेंट गर्लफ्रेंड्सनी सोबत साजरा केला सलमानचा बर्थडे, संगीता-युलियाने एकत्र केली राइड

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 28, 2017, 05:08:00 PM IST

मुंबईः अभिनेता सलमान खानने अलीकडेच त्याच्या पनवेलस्थित फार्म हाऊसवर 52 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी खान कुटुंबीयांसोबत सलमानची सो-कॉल्ड गर्लफ्रेंड यूलिया वंतूर उपस्थित होती. इतकेच नाही तर त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीदेखील बर्थडे पार्टीत सहभागी झाली होती. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 26 डिसेंबर रोजी रात्री झालेल्या सलमानच्या बर्थडे सेलिब्रेशननंतर दुस-या दिवशी युलिया आणि संगीताच एकाच गाडीतून राइड घेताना दिसल्या.


समोर आले फार्म हाऊसमधील पार्टीचे फोटोज...  
- अलीकडेच पनवेलच्या फार्म हाऊसवर झालेल्या पार्टीचे फोटोज समोर आले आहेत.
- यापैकी काही फोटोजमध्ये सलमान खान स्वतः कार चालवताना दिसतोय.
- तर एका फोटोत सोहेल त्याच्या मुलासोबत कार चालवतोय.

 

सलमान साजरा करणार नव्हता यंदा वाढदिवस...
- सलमान दरवर्षी पनवेलच्या त्याच्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करत असतो. पण यावर्षी तो वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्याने काही दिवसांपूर्वी मीडियाला सांगितले होते.
- पण सलमानच्या बर्थडे सेलिब्रेशनची बातमी कळताच फोटोग्राफर्स पाहुण्यांपूर्वीच फार्महाऊसवर पोहोचले आणि त्यांनी येथे आलेल्या प्रत्येक सेलिब्रिटीचे फोटोज कॅमे-यात कैद केले.

 

पार्टीमुळे अनुष्काच्या रिसेप्शनला मारली सलमानने दांडी...

- 26 डिसेंबर रोजी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे दुसरे वेडिंग रिसेप्शन होते. पण बर्थडे पार्टीमुळे त्याने रिसेप्शनला दांडी मारली. 26 डिसेंबरच्या संध्याकाळीच सलमान त्याच्या फॅमिलीसोबत फार्म हाऊसवर पोहोचला होता.


पुढील स्लाईड्सवर बघा, सलमान खानच्या बर्थडे पार्टीचे PHOTOS...