एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर, अजित पवारही राहणार उपस्थित

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 28, 2017, 05:56:00 PM IST

जळगाव- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे आज जळगावात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत एकत्र व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार असल्याने राज्यातील भाजप नेत्यांचेही या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे. 

 

 

पारोळा एरंडोलचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या वयाच्या साठीत पदार्णपणानिमित्त गौरव सोहळा पार पडत आहे. जळगाव जिल्ह्यातील  खडसे समर्थक आमदारांची या कार्यक्रमाला असणारी उपस्थितीही आश्चर्यजनक राहणार आहे. 

दरम्यान, खडसे हे राज्याचे नेते असल्याने त्यांच्यासारखा वजनदार नेता राष्ट्रवादीत आला तर त्यांचे स्वागतच असल्याचे मत राष्ट्रवादीने व्यक्त केले आहे.

 

 

खडसेंना काँग्रेसचीही ऑफर
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी एकनाथ खडसेंना काँग्रेसमध्ये यायची ऑफर दिली होती. यशोमती ठाकूर यांच्या या ऑफरला उत्तर देताना खडसेंचा आवाज काहीसा बदलला आणि येऊ शकतो असे सांगत या पक्षासाठी 40 वर्षं काम केले, पण परिस्थिती काय घडवेल सांगता येत नाही, असे उत्तर देऊन खडसेंनी विधानसभेत एकच खळबळ उडवून दिली होती. हे कसले सरकार असा सवालही त्यांनी आपल्याच भाजप सरकारला विचारला.

 

 

पुढील स्लाईडवरआणखी फोटो आणि माहिती