दुचाकींच्या अपघातात 2 युवकांचा मृत्यू, एक जण जखमी

  • प्रतिनिधी
  • Dec 28, 2017, 07:01:00 PM IST

पंचक (जळगाव)- पंचक गावाजवळ  (ता.चोपडा) 2 दुचाकींच्या अपघातात  दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गणेश शांताराम पाटील (वय 29 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. ते जळगावहुन पंचकला परत येतांना गुरूवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा (वय 2 वर्षे) असा परिवार आहे. त्यांची पुतणी खुशी प्रदीप पाटील (वय 4 वर्षे) या अपघातात जखमी झाली आहे. तौफिक शेख मुख्तार (वय 28, रा. चिनावल, ता.रावेर अडावद, ता.चोपडा) यांचाही या अपघातात मृत्यू झाले ते लग्नासाठी आले होते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो