केंद्र सरकारने दर महिन्याला होणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीचा निर्णय घेतला मागे

  • दिव्य मराठी
  • Dec 28, 2017, 09:11:00 PM IST

नवी दिल्ली- दर महिन्याला घरगुती गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. गरीबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन देण्याच्या उज्ज्वला योजनेच्या उलट हा निर्णय असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे.



जून 2016 मध्ये केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या दरात 4 रुपयांनी वाढ करण्याचे आदेश दिले होते. गॅस सिलिंडरवर दिले जाणारे अनुदान हळूहळू रद्द करण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला होता. पण कंपन्यांना देण्यात आलेल्या दरवाढीचा आदेश सरकारने ऑक्टोबरमध्ये परत घेतला होता. यामुळेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने ऑक्टोबरपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलीही वाढ केली नाही.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो