फक्त जगभ्रमंती, फोटोग्राफी करून करोडो कमवतेय हे DREAM COUPLE

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 28, 2017, 07:05:00 PM IST

इंटरनॅशनल डेस्क -  जेस अॅलन आणि पिक्सी मारलन या दोघांची भेट काही वर्षांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या एका बारमध्ये झाली होती. त्यावेळी 21 वर्षींची पिक्सी एक प्रोफेशनल मॉडेलिंग फोटोग्राफर होती. तर, तेव्हा 24 वर्षीय असलेला जेस फोटोग्राफी शिकत होता. बोलण्यातून दोघांनाही फिरणे आणि फोटोग्राफीचा छंद असल्याचे कळाले. त्याचवेळी दोघे परदेशांत फिरायला गेले आणि वर्षभर ऑस्ट्रेलियात परतलेच नाहीत. तेव्हापासून आजपर्यंत हे कपल एकत्रित आहे. सारे जग फिरून फोटोग्राफीच्या माध्यमातून करोडोंची कमाई करत आहेत. त्यांचे स्वतःचे बिकिनी आणि फॅशन ब्रॅन्ड्स सुद्धा आहेत. 


> जेस आणि पिक्सी यांची पहिली भेट झाली तेव्हा जेस फोटोग्राफी स्कूलमध्ये छायाचित्रणाचे धडे घेत होता. प्रोफेशनल फोटोग्राफर पिक्सीने त्याला 'स्कूल सोड, मी तुला फोटोग्राफी शिकवते' असा प्रस्ताव दिला. तेव्हापासून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
> जेस आणि पिक्सी यांचे फोटो प्लेबॉयच्या थीमवर आधारित असतात. डेली मेल ऑस्ट्रेलियाशी संवाद साधताना पिक्सीने 2016 च्या प्लेबॉय मॅगझीनचे उदाहरण दिले. प्रसिद्ध मॉडेल्स आणि अॅक्ट्रेसचे न्यूड फोटोज छापणाऱ्या प्लेबॉय मॅगझीनला सुरुवातीला एक गलिच्छ आणि तुच्छ मॅगझीन म्हटले जायचे. मात्र, आज प्लेबॉयचे साऱ्या जगात नाव घेतले जाते.
> या दोघांनी क्रिएटिफ कंपनी सुरू केली आहे. या कंपनीचे स्विमवेअर आणि बिकिनी जगभरात गाजल्या आहेत. न्यूड फोटोशूटच्या वेळी फोटोग्राफरसोबत एखादी महिला असल्यास मॉडेल्स सुद्धा कॉन्फिडेंट फील करतात असे जेस आपल्या पत्नीबद्दल सांगतो. 
> जेस आणि पिक्सी यांचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. त्यावरूनच ते आपल्या फोटोज आणि प्रॉडक्ट्सचे ब्रॅन्डिंग करतात.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कपलचे आणि त्यांनी टिपलेले ग्लॅमरस फोटोज...