मोबाईलवर ब्‍लू फिल्‍म पाहण्‍याचे जडले व्‍यसन, त्‍यामुळे घडला हा गुन्‍हा

  • दिव्‍य मराठी वेब टीम
  • Dec 28, 2017, 02:03:00 PM IST

महोबा (उत्‍तर प्रदेश)- 3 महिन्‍यांपूर्वी 6 वर्षांच्‍या एका मुलीवर बलात्‍कार केल्‍याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी एका आरोपीला अटक केली आहे. तपासादरम्‍यान आरोपीने सांगितले की, त्‍याला मोबाईलवर ब्‍लू फिल्‍म पाहण्‍याचे व्‍यसन जडले होते. त्‍याच कारणामुळे असा गंभीर गुन्‍हा घडला.

 

काय होते प्रकरण?
-  उत्‍तरप्रदेशमधील महोबा जिल्‍ह्यात कोतवाली भागात हा प्रकार घडला आहे. समीर अली (18) असे आरोपीचे नाव आहे.
- तपासादरम्‍यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, घटनेच्‍या रात्रीही तो मोबार्इलमध्‍ये ब्‍लू फिल्‍म पाहत होता. त्‍यानंतर मुलीच्‍या घरासमोर त्‍याने चकारा मारल्‍या.
- 6 वर्षांची मुलगी बाहेर येताच आरोपीने तिचे अपहरण केले. नंतर तिला मादक पदार्थ हुंगायला लावून बेशुद्ध केले व तिच्‍यावर बलात्‍कार केला.
- दुष्‍कृत्‍यानंतर मुलीला घटनास्‍थळी गंभीर अवस्‍थेत तसेच सोडून आरोपी फरार झाला होता.


काय म्‍हणाले पोलिस?
- या घटनेच्‍या तपासासाठी दोन टीम बनवण्‍यात आल्‍या होत्‍या. यासाठी अनेकांची चौकशी करण्‍यात आली. अखेर आरोपीला पकडण्‍यात पोलिसांना यश आले आहे.
- आरोपीने आपला गुन्‍हा कबूल केला आहे. घटनास्‍थळावरुन पुरावे मिळालेले आहेत. ब्‍लू फिल्‍म पाहून आरोपीने मुलीवर बलात्‍कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.